महात्मा गांधीचे नातू कनुभाई रामदास गांधी यांचे सोमवारी (दि. ७) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सूरत येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कनुभाई यांनी नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काही दिवसांपूर्वी ते कृत्रिम श्वासोच्छवासावर ते होते. हृदयविकार व लकवा मारल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कनुभाईंच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
सध्या कनुभाई आपल्या बहिणीकडे बंगळुरूमध्ये राहत होते. प्रकृती बिघडल्यामुळे सुरतला आले होते. ते सुरत येथील राधाकृष्ण मंदिरातील संत निवास येथे राहत होते. तीन वर्षांपूर्वीच ते अमेरिकेतून भारतात परतले होते. प्रारंभी त्यांनी दिल्ली, वर्धा, नागपूर येथे वास्तव्य केले. त्यानंतर ते सूरत येथील वृद्धाश्रमात काही महिने राहिले होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते आपल्या पत्नीबरोबर सूरत येथील राधाकृष्ण मंदिरात राहत होते.