पाकिस्तानच्या दुर्गम भागात महिला शिक्षणासाठी प्रयत्न करताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार झालेल्या मलाला युसफझाई हिला स्वीडनच्या ‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज’साठी नामांकन मिळाले आहे. ‘बाल नोबेल’ म्हणून ओळखले जाणारे हे पारितोषिक बाल हक्क आणि शिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना दिले जाते.मलालाने केलेले काम जगभरातील बालकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे तिला या पारितोषिकासाठी नामांकन मिळाले, असे या पारितोषिकासाठी ज्युरीचे काम करणाऱ्या लिव क्जेलबर्ग यांनी सांगितले. ‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज’ हे २००० पासून देण्यात येते. ११० देशांतील ६० हजार शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवून या पारितोषिकासाठी बालकांना नामांकन देण्यात येते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
मलाला युसफझाई हिला ‘बाल नोबेल’चे नामांकन
पाकिस्तानच्या दुर्गम भागात महिला शिक्षणासाठी प्रयत्न करताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार झालेल्या मलाला युसफझाई हिला स्वीडनच्या ‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज’साठी नामांकन मिळाले आहे.
First published on: 07-02-2014 at 12:20 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malala yousafzai nominated for childrens nobel