‘बाल नोबेल पुरस्कार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी तीन जणांना नामांकने देण्यात आली असून त्यामध्ये पाकिस्तानातील युवा कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिचा समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉन वूड आणि नेपाळमधील बालहक्क कार्यकर्ती इंदिरा राणामगर या दोघांनाही नामांकने देण्यात आली आहेत. जॉन वूड यांनी दहा देशांतील लक्षावधी मुलांना ग्रंथालय आणि शिक्षणाशी जोडले आहे. मलालाने मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या लढय़ासाठी तिला नामांकित करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2014 रोजी प्रकाशित
बाल नोबेल पुरस्कारासाठी ‘मलाला’ला नामांकन
‘बाल नोबेल पुरस्कार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी तीन जणांना नामांकने देण्यात आली असून त्यामध्ये पाकिस्तानातील युवा कार्यकर्ती मलाला युसूफझाई हिचा समावेश करण्यात आला आहे.
First published on: 09-02-2014 at 12:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malala yousafzai nominated for childrens nobel