मालदीव हा देश गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. भारतात या देशाबद्दल बरीच चर्चा चालू आहे. उभय देशांमध्ये पर्यटनावरून झालेल्या वादानंतर भारताने मालदीवकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे मालदीवमधील नेते आता भारतावर कौतुकाचा वर्षाव करू लागले आहेत. दरम्यान, मालदीवच्या माजी संरक्षण मंत्री मारिया दिदी यांनी मालदीव आणि भारताच्या संबंधांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. मारिया दिदी म्हणाल्या, सध्या मालदीव भारतात खूप चुकीच्या कारणांमध्ये प्रसिद्ध होत आहे. प्रामुख्याने भारतात समाजमाध्यमांवर मालदीवची प्रतिमा खराब होत आहे. भारतातल्या समाजमाध्यमांवर दिसतोय तसा आमचा मालदीव नक्कीच नाही.

मारिया दिदी म्हणाल्या, भारतातल्या समाजमाध्यमांवर मालदीव आणि मालदीवच्या लोकांबद्दल जी चर्चा चालू आहे तसा आमचा देश नाही, आमचे नागरीकही तसे नाहीत. इतर देशांमधून आमच्या देशात आलेल्या लोकांचं आम्ही स्वागत करतो. परदेशी पर्यटक आमच्या देशात आलेलं आम्हाला आवडतं. आम्ही नेहमीच त्यांच्या स्वागतासाठी तत्पर असतो. मला असं वाटतं की, मालदीवबाबत भारतीय लोकांची धारणा बदलली पाहिजे. मारिया दिदी या फर्स्टपोस्ट डिफेन्स समिटमध्ये बोलत होत्या.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
PM narendra Modi about changing Constitution India Bloc Rahul Gandhi loksabha election 2024
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?
BJP manifesto 2024 Sankalp Patra continuity amid change
भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?
Maldives Minister Mariyam Shiuna
मालदीवच्या निलंबित मंत्र्याकडून भारतीय ध्वजाचा अपमान; तीव्र प्रतिक्रिया उमटताच मागितली माफी

यासह मालदीवच्या माजी संरक्षण मंत्र्यांनी भारताचं कौतुकही केलं. मारिया दिदी म्हणाल्या, जेव्हा-जेव्हा मालदीवला गरज होती तेव्हा आपला शेजारी देश म्हणजेच भारताने आपली मदत केली आहे. भारताने नेहमीच मालदीवच्या अडचणींच्या काळात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच भारत श्रीलंकेचीही मदत करतो. भारतासह शेजारील राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध ठेवणं हे आमच्या सरकारचं पहिलं उद्दीष्ट होतं. मला आशा आहे की, भारत आणि मालदीवमधील संबंध सुधारतील, उभय देशांमधील परिस्थिती पहिल्यासारखी होईल.

हे ही वाचा >> स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीऐवजी सत्तास्थापनेकडे लक्ष! पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

नेमकं प्रकरण काय?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप बेटांना भेट दिली होती. मोदींनी त्यांच्या या सहलीदरम्यानचे काही फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले होते. भारत गेल्या काही महिन्यांपासून लक्षद्वीपचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून प्रचार करत असतानाच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढाकार घेतल्यानंतर अनेकांचं लक्ष लक्षद्वीपकडे वळलं. परंतु, हे पाहून भारताच्या नैऋत्येला असलेल्या मालदीव या देशातील काही लोकांचा तिळपापड झाला. मालदीवमधील काही नागरिकांनी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी भारताचा अपमान करणाऱ्या टिप्पण्या केल्या. यापैकी काही जण एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भारतीय नागरिकांवरही वर्णद्वेषी टीका केली. पंतप्रधान मोदींवरही टीका केली गेली. त्यामुळे मालदीवला गेल्या काही महिन्यांपासून भारतीय नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. मालदीवमधील मंत्र्यांच्या भारतावरील अपमानास्पद टीकेनंतर भारतात मालदीववर बहिष्कार टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. समाजमाध्यमांवर बॉयकॉट मालदीव असा हॅशटॅग काही दिवस ट्रेंडिंगमध्ये होता. या वादात सामान्य नागरिकांसह राजकारणी, खेळाडू आणि चित्रपट कलाकारांनीदेखील उडी घेतली. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. परिणामी मालदीवला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या कमी होऊ लागली आहे. याचा मालदीवच्या पर्यटनाला फटका बसत आहे.