Crime News : रस्त्यावर एखादा अपघात झाल्यावर जखमींच्या मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. मात्र अमेरिकेतील एका महिलेला मात्र एका भयानक अनुभवाला सामोरे जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या व्यक्तीने जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना १५ सप्टेंबर २०२३ रोजी घडली होती.

त्यानंतर गेल्या गुरूवारी ४० वर्षीय ब्रेंडन ली जोन्स याला लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतील फोर्ट लॉडरडेल पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कथित पीडितेने पोलिसांना सांगितले की. तिच्यावर केएफसीच्या मागे कुठेतरी ३१०० डब्ल्यू. ब्रोवर्ड ब्लव्ड येथे बलात्कार झाला होता.

जोन्स याला पीडित महिला ड्रग डिलर ‘ट्विन’ म्हणून ओळखत होती. त्याने त्या दिवशी तिला डिल्लार्ड हाय स्कूलच्या जवळच्या किराणा दुकानाजवळून उचलले. महिलेने सांगितले की, ती गाडी चालवत असताना तिला मागून धडक देण्यात आली होती आणि ती जखमी झाली होती.

पीडित महिलेने कथितपणे जोन्स आणि त्याच्या मित्राला तिला रुग्णालयात घेऊन जाणार नसतील तर घरी घेऊन चला असं सांगितलं. पण ते दोघे तिला जोन्स याच्या घरी घेऊन आले, जेथे ती त्याच्या बेडवरच झोपी गेली. अचानक महिलेला जाग आली तेव्हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता. पीडितेने पोलिस अधिकार्‍यांना सांगितले की त्या वेळेला तिला अत्यंत असहाय्य वाटत होते. २०२४ मध्ये गोळा केलेल्या रेप किट पुरव्यामध्ये त्याचे डीएनए आढळून आले होते, त्यानंतर जोन्स याला अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्लोरिडा डिपार्टमेंट ऑफ करेक्शनच्या रेकॉर्ड्सनुसार जोन्स हा दरोडा, कोकेन विक्री आणि पळून जाणे अशा वेगवेगळ्या आरोपाखाली यापूर्वी तुरूंगात जाऊन आलेला आहे. शुक्रवार पर्यंत जोन्स हा ब्रॉवर्ड मेन जेलमधील तुरूंगात होता, जिथे त्याला १५००० डॉलर्सच्या बाँन्डवर ठेवण्यात आले आहे.