दी केरला स्टोरी चित्रपटाची सध्या देशभर चर्चा चालू आहे. चित्रपटात करण्यात आलेल्या दाव्यांवरून काही ठिकाणी वादही झाल्याचं समोर आलं आहे. ३२ हजार महिलांचं धर्मांतरण केल्याचा दावा चित्रपटात करण्यात आला आहे. यावरून दावे-प्रतिदावे केले जात असताना दुसरीकडे राजस्थानमध्ये चित्रपटाचं समर्थन करणाऱ्या एका व्यक्तीवर तीन अज्ञातांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही व्यक्ती विश्व हिंदू परिषदेची सदस्य असल्याची माहिती पीटीआयच्या वृत्तात देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

घडल्या प्रकारासंदर्भात संबंधित व्यक्तीने राजस्थानमधील मंदीर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस सहआयुक्त देरावर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसा, पीडित व्यक्तीने पोलिसांना या सगळ्या घटनाक्रमाची माहिती दिली. शनिवारी रात्री घरी परतत असताना तीन व्यक्तींनी पीडित व्यक्तीला थांबवून दमदाटी केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, दी केरला स्टोरी चित्रपटाचं व्हॉट्सअॅप स्टेटसवर कौतुक केल्याबद्दलही त्याला दमदाटी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, या पोस्टमध्ये इतर तरुणींनाही चित्रपट आवर्जून बघण्याचा आग्रह करण्यात आल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी दी केरला स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. केरळमध्ये या चित्रपटाच्या विषयामुळे आणि त्यातील दाव्यांमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, त्याचे पडसात देशात इतर ठिकाणीही उमटताना पाहायला मिळत आहेत.