वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येने देशात खळबळ उडाली आहे. तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने श्रद्धाचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. श्रद्धाच्या हत्येनंतर देशात अनेक तुकडे करून खून केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता झारखंडमध्येही पतीने आपल्या पत्नीचा ५० तुकडे करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
झारखंडमधील साहेबगंज येथील बोरीओ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रुबिका पहाडीन असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर दिलदार अन्सारी असे खून करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा : धक्कादायक! पुतण्याकडून विधवा काकूची हत्या, मृतदेहाचे १० तुकडे केले अन्…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबिका ही दिलदारची दुसरी पत्नी होती. दिलदालरने रुबिकाला खोटे आश्वासन लग्न केलं होतं. शनिवारी रुबिनाचा खून करून दिलदारने बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना संथाली मोमी टोला भागात एका जुन्या घरात महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तिचा पती दिलदारला विचारपूस करत अटक केली आहे. मात्र, दिलदारने खून का केला, याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
हेही वाचा : पालघरमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; आठ आरोपींना अटक
साहेबगंज पोलीस अधिक्षकांनी एएनआयला सांगितल्यानुसार, साहेबगंज परिसरातील एका २२ वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे १८ तुकडे सापडले आहेत. अद्यापही मृतदेहाच्या काही भागांचा शोध सुरु आहे. तिच्या पती दिलदार अन्यारीला ताब्यात घेतलं आहे. दिलदारने इलेक्ट्रिक कटरने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची शंका आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.