केरळमधील कसारगोड येथे एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे. येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीने आधी त्याच्या लिव्ह इन जोडीदाराची हत्या केली आणि त्यानंतर तीन दिवस तिच्या मृतदेहासोबत घरात राहिला. तीन दिवस मृतदेहासोबत घरात राहिल्यानंतर या नराधमाने मुंबईला पळून जाण्याचं प्लॅनिंग केलं. परंतु त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी या आरोपीला आपल्या ताब्यात घेतलं आहे. आरोपीचं नाव अँटो सेबेस्टियन असं आहे. त्याने २७ जानेवारी रोजी त्याची लिव्ह इन जोडीदार नीतू कृष्णन हिची हत्या केली. त्यानंतर एकाच घरात तो त्या मृतदेहासोबत राहिला. या तीन दिवसात कोणालाच या हत्येची कानोकान खबर लागली नाही. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अँटोने जे काही सांगितलं ते एकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
आरोपी अँटोने पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितलं की, नीतू ही एक घटस्फोटित महिला आहे, जी त्याची लिव्ह इन पार्टनर होती. अँटो जेव्हा कोट्टम येथे रंगाऱ्याचं काम करत होता तेव्हा त्याची नीतूसोबत ओळख झाली. २६ जानेवारी रोजी त्याचं आणि नीतूचं क्षुल्लक कारणावरून भांडण झालं होतं. त्यानंतर नीतूने अँटोला सोडून जाण्याची धमकी दिली.
हे ही वाचा >> “…मी आत्महत्या करेन”, नव्या नवरीच्या चेहऱ्यावरील पदर हटवताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
दुर्गंधीमुळे हत्येचा संशय
दुसऱ्या दिवशी नीतू आणि अँटोचं पुन्हा एकदा भांडण झालं. त्यानंतर अँटोने नीतूची हत्या केली. हत्येनंतर त्याने नीतूचा मृतदेह घरातच ठेवला. अँटो याच घरात राहात होता. तीन दिवसांनंतर मृतदेहाची दुर्गंधी पसरू लागली. त्याचवेळी अँटो कोझीकोडे येथे चित्रपट बघायला गेला होता. तिथूनच तो ट्रेनने मुंबईला पळून जाणार होता. परंतु पोलिसांनी त्याचा माग काढला आणि कोझीकोडे येथे त्याच्या मुसक्या आवळल्या.