कर्नाटकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका इसमाने अगदी क्षुल्लक कारणावरून आपल्या आई आणि बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी या आरोपीला अटक केली. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. हत्या झालेल्या महिलेचे वय ४२ वर्षे होते तर त्याची बहीण केवळ १९ वर्षांची होती. चवदार सांबर बनवले नाही म्हणून या इसमाने आपल्या आई आणि बहिणीची हत्या केली आहे.

या आरोपीचे नाव मंजुनाथ हसलर असून मयत आईचे नाव पार्वती नारायण ह्सलास आणि बहिणीचे नाव राम्या नारायण हसलर असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुनाथ हा दारूच्या अधीन गेला होता. तो अनेकदा घरामध्ये कोणत्याही कारणावरून वाद घालायचा. बुधवारी तो घरी येऊन जेवायला बसला तेव्हा बनवलेले सांबर चवदार झाले नसल्याने त्याची आई आणि बहीण यांच्याशी भांडण झाले. इतकंच नाही तर तो आपल्या बहिणीला नवा मोबाईल फोन विकत घेऊन देण्याच्याही विरोधात होता.

बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी खर्च केले कोट्यवधी रुपये; भेटवस्तू पाहून व्हाल थक्क

मंजूनाथ आणि त्याच्या आईचे बहिणीला नवा फोन विकत घेऊन देण्यावरून भांडण सुरु होते. “मी माझ्या मुलीला फोने विकत घेऊन द्यायचा की नाही हे सांगणारा तू कोण आहेस?”, असा सवाल यावेळी आईने मंजुनाथला केला. याचाच राग येऊन त्याने घरामध्ये असलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलाने आपल्या आई आणि बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंजुनाथचे वडील जेव्हा घरी परतले तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. घरी आल्यावर त्यांनी पाहिले की आपल्या मुलाने आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केली आहे. दरम्यान, मंजूनाथवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. त्याचबरोबर पार्वती आणि राम्याचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.