Crime News : पती आणि पत्नीचं नातं हे नातं विश्वासाचं नातं मानलं जातं. प्रेम, आपुलकी आणि माया हे सगळंच या नात्याच्या मुळाशी असतं. मात्र या नात्याला पवित्र काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पतीने पाच महिन्यांची गरोदर असलेल्या पत्नीला संपवलं आहे. तिच्या मृतदेहाचे तुकडे नष्ट करताना तो पकडला गेला आहे. ही घटना तेलंगणातील हैदराबादची आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पाच महिन्यांच्या गरोदर असलेल्या पत्नीला ठार करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे नष्ट करण्याच्या तयारीत असलेल्या तिच्या पतीला आम्ही अटक केली. आम्ही त्याला पकडलं तेव्हा त्याने पत्नीचं शीर, हात, पाय हे सगळे तुकडे करुन मुशी नदीत फेकले. आणखी तुकडे फेकत असताना त्याला अटक करण्यात आली. मृत महिलेचं नाव स्वाती होतं. ती २१ वर्षांची होती. तसंच ती पाच महिन्यांची गरोदर होती. हैदराबादच्या बालाजी हिल्स भागात ही धक्कादायक घटना घडली. महेंदर असं या माणसाचं नाव आहे. आम्ही त्याला पत्नीच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे. स्वाती आणि महेंदर हे दोघंही विक्रमबाद जिल्ह्यातले होते. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर हे दोघं हैदराबादच्या बालाजी हिल्स भागात वास्तव्य करु लागले होते.

मृतदेहाचे काही तुकडे महेंदरने नदीत फेकले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (२३ ऑगस्ट) महेंदरने त्याच्या पत्नीची म्हणजेच स्वातीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यातले काही तुकडे त्याने नदीत फेकले. त्यानंतर त्याने त्याच्या बहिणीला फोन केला आणि स्वाती कुठे गेली माहीत नाही असं सांगत ती बेपत्ता झाल्याच बनाव रचला. भावाला त्याच्या बोलण्यावरुन संशय आला. तिने काही नातेवाईकांना याबाबत कळवलं. ज्यानंतर महेंदरला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. तिथेही त्याने माझी पत्नी बेपत्ता झाली आहे असंच सांगितलं. पण नंतर पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

महेंदरने गुन्हा कसा मान्य केला?

महेंदर याला अटक करण्यात आली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वातीचं शीर, हात, पाय हे अवयव त्याने मुशी नदीत फेकले. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाणबुड्यांना पाठवलं पण त्यांना अद्याप त्या तुकड्यांचा सुगावा लागलेला नाही. स्वातीच्या मृतदेहाचे काही अंश सापडले आहेत. आम्ही डीएनए चाचणी करतो आहोत. त्यानंतर याबाबत माहिती देऊ असंही पोलिसांनी सांगितलं. आम्ही आता महेंदर विरोधात गुन्हा नोंदवला आहे आणि त्याची चौकशी सुरु आहे. स्वातीच्या वडिलांनी हे सांगितले महेंदर आणि माझ्यात मतभेद होते त्यामुळे आम्ही फार कमी बोलत होतो.माझी मुलगी सांगायची की ती बरी आहे. पण तो बहुदा नेहमीच तिला त्रास देत होता असाही आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.