ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजीच्या आमिषाने एका तरुणाला तब्बल १.५ कोटींचा फटका बसला आहे. या धक्क्यामुळे संबंधित तरुणाच्या पत्नीने घरातच आत्महत्या केली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बंगळुरुतील चित्रदुर्ग येथे लघु पाटबंधारे विभागात सहाय्यक अभियंता असलेल्या दर्शन बाळूला ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी लावण्याची सवय होती. याकरता त्याने कोट्यवधींचं कर्जही घेतलं होतं. परंतु, कर्ज वेळेत फेडता न आल्याने त्याला धमक्या येत होत्या. तसंच, बदनामी करण्याचीही धमकी देण्यात आली होती. या धमक्यांना घाबरून त्याच्या पत्नीने घरात आत्महत्या केली. यावेळी तिने तिच्याकडे पैसे मागणाऱ्या लोकांवर ठपका ठेवला. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी १३ जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Loksatta Documentary Discovery channel David Attenborough Director
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘पाहण्या’च्या पर्यायांत दिशादर्शक…
doctor
‘मार्ड’ डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन
Senior Police Inspector in ACB net Accused of demanding bribe by getting money back from the complainant Mumbai
वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; तक्रारदाराला पैसे परत मिळवून लाचेची मागणी केल्याचा आरोप
kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…
Drug inspector arrested for asking bribe to open drug shop in Kalyan
कल्याणमध्ये औषध दुकान सुरू करण्यासाठी लाच मागणारा औषध निरीक्षक अटकेत
extortion case
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; खंडणी प्रकरण
mumbai businessmen, cheated for rupees 1 crore
मुंबई: स्वस्त सोन्याची बिस्किटांच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
Yavatmal, Moneylender, kidnapped,
यवतमाळ : सावकाराचे अपहरण केले, खंडणीची रक्कम ठरली, हातात नोटांची पिशवी येणार एवढ्यात…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजीताने एक सुसाईड नोट ठेवली आहे. यात तिने तिच्या पतीने कर्ज घेतल्याचं म्हटलं आहे. कर्ज फेडता न आल्याने छळ होत असल्याचंही तिने या लिहिलं. त्यामुळे तक्रारीच्या आधारावर १३ सशंयितांवर ४०६ अंतर्गत आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी शिवू, गिरीश आणि व्यंकटेश यांना अटक करण्यात आली आहे. तर, अद्याप काही फरार आहेत. दर्शन आणि रंजिता यांना दोन वर्षांचा मुलगा आहे.

दर्शनने क्रिकेट सट्टेबाजीत दीड कोटी गमावले होते. परंतु, त्याने त्यापैकी बहुतेक पैशांची परतफेड केली होती. तरीही त्याच्यावर ५४ लाखांचं कर्ज होतं, अशी प्रतिक्रिया दर्शनच्या सासऱ्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.

ते म्हणाले, माझा जावई निर्दोष आहे. तो क्रिकेट सट्टेबाजीत उतरण्यास तयार नव्हता. पण श्रीमंत होण्याचा एक सोपा मार्ग असल्याने त्याच्यावर संशयित आरोपींनी जबरदस्ती केली. सट्टेबाजीसाठी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं. तसंच, काही कोरे धनादेशही त्याला देण्यात आले होते.