उत्तर प्रदेशच्या गाझियाबादच्या लोणी भागात चपाती बनवताना एक व्यक्ती पीठावर थुंकताना दिसत असलेल्या एका व्हायरल व्हिडिओची उत्तर प्रदेश पोलिसांनी दखल घेतली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनेच्या लोकांनी तक्रार दाखल केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर लोकांचा संताप अनावर झाला असून त्याच्या अटकेची मागणी होत आहे. त्यानंतर गाझियाबाद पोलिसांनीही व्हायरल व्हिडीओवरुन शोध घेत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी स्वतः व्हायरल व्हिडिओची दखल घेतली आणि आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले. लोणीचे पोलिसांनी आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. व्हिडिओ खरा असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.
याआधीही उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका लग्न समारंभात रोटी बनवताना पिठावर थुंकताना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली. नौशाद असे आरोपीचे नाव होते. हिंदू जागरण मंच मेरठचे प्रमुख सचिन सिरोही यांच्या पोलिस तक्रारीत नौशादवर करोना विषाणू पसरवल्याचा आरोप होता. हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील आहे.
