टोमॅटोच्या किमती सध्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडलं आहे. काही दिवसांपूर्वी शंभरीच्या आत असलेला टोमॅटोचा दर १३० रूपयांच्या पुढे गेला आहे. हीच दरवाढ पती-पत्नीमध्ये वादाच कारण ठरली आहे. जेवण बनवताना भाजीसाठी दोन टोमॅटो वापरल्याने पत्नी मुलीसह घर सोडून गेली आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील शाहदोल जिल्ह्यात समोर आली आहे. संजीव बर्मन असं व्यक्तीचं नाव असून, ते पत्नी आणि मुलीसह राहतात. संजय बर्मनचा खाणावळीचा व्यवसाय आहे.
हेही वाचा : Video Viral: हे फक्त मुंबई लोकलमध्येच घडू शकतं! चक्क ट्रेनमध्ये वाळत टाकले कपडे, Video होतोय व्हायरल
काही दिवसांपूर्वी जेवण तयार करताना संजीवने पत्नीला न विचारता दोन टोमॅटोचा वापर केला होता. याच कारणातून पती-पत्नीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे रागावलेली पत्नी मुलीसह घर सोडून निघून गेली.
संजीवने पत्नी आणि मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्या कुठेही सापडल्या नाहीत. यानंतर संजीने पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
हेही वाचा : शूज द्या, बिअर प्या; शॉप मालकाची अनोखी ऑफर; यामागचे कारण वाचून तुम्हीही व्हाल चकित
याबाबत संजीव बर्मनने बोलताना सांगितलं की, “जेवण बनवत असताना दोन टोमॅटोचा वापर केल्याने पत्नीबरोबर वाद झाला. त्यानंतर रागाने पत्नी मुलीसह घर सोडून गेली. गेली तीन दिवस झाले पत्नीशी कोणताही संपर्क झाला नाही. अथवा तिच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती मिळाली नाही.”