इंटरनेटच्या महाजालात सर्वात लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल डॉट कॉम’ या संकेतस्थळाचा मालक होण्याची संधी एका भारतीय तरुणाला मिळाली. ‘गुगल डोमेन’कडून अनवधानाने घडलेली चूक भारतातील कच्छ भागात राहणाऱया सन्मय वेद या तरुणाने हेरली आणि एका मिनिटासाठी का असेना पण त्याने ‘गुगल’च्या डोमेनची मालकी मिळवली होती. यासाठी ‘गुगल’कडून सन्मयला आठ लाखांचा पुरस्कार देखील देण्यात आला. त्याचं झालं असं की, सन्मय वेद इंटरनेटवर डोमेन सर्च करत असताना त्याने पाहिले की ‘गुगल डॉट कॉम’ हे डोमेन नाव विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याने त्वरित १२ डॉलर्समध्ये हे डोमेन खरेदीही केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यादरम्यान, ‘गुगल’ला चूक लक्षात आल्यानंतर विक्री सूचना मागे घेईपर्यंत सन्मय वेबमास्टर टूल्सपर्यंत पोहोचून डोमेनचा मालक झाला होता. त्यानंतर गुगलने मिनिटभराच्या आत मालकी पुन्हा मिळवली पण सन्मयने केलेल्या पराक्रमापोटी ‘गुगल’ने त्याला ४ लाख ७ हजार रुपयांची रक्कम पुरस्कार स्वरूपात देऊ केली. दरम्यान, सन्मयने ‘गुगल’कडून मिळालेली रक्कम एका सेवाभावी संस्थेला दान करण्याचे ठरविले. सन्मयच्या या निर्णयाची माहिती मिळताच ‘गुगल’ने पुरस्काराची रक्कम दुप्पट केली.

गुगल डोमेनची विक्री-

(Courtesy: Sanmay Ved/LinkedIn)

 

गुगल डोमेन खरेदी केल्यानंतर सन्मयच्या ई-मेलवर आलेली प्रत-

(Courtesy: Sanmay Ved/LinkedIn)
More Stories onगुगलGoogle
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man who owned google for 1 minute after buying domain name gives company reward to charity
First published on: 01-02-2016 at 09:55 IST