दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती स्थिर आहे. फुफ्फुसाला संसर्ग झाल्याने मंडेला यांना दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९५ वर्षीय मंडेला यांची श्वसनक्रिया व्यवस्थित सुरू  असल्याचे त्यांच्या माजी पत्नी विनी मंडेला यांनी सांगितले.
 विनी मंडेला यांनी एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत मंडेला यांच्या प्रकृतीत कसे चढउतार झाले ते सांगितले. मंडेला यांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या बातम्यांनी कुटुंबीयांना धक्का बसला हे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या भावना लोकांच्या लक्षात येत नाहीत काय, असा सवाल त्यांनी केला. मंडेला यांची प्रकृती जरी चिंताजनक असली, तरी त्यांची मुले जेव्हा त्यांची विचारपूस करण्यास जातात तेव्हा त्यांचे डोळे उघडे असतात असे विनी यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक जीवनातून २००४ मध्ये नेल्सन मंडेला निवृत्त झाले.