येत्या सोळा मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांची निवृत्ती अपेक्षित असून त्यांना लगेच दुसऱ्या बंगल्यात हलता येईल, अशी तयारी करण्यात आली आहे. त्यांना मोतीलाल नेहरू रोड येथील बंगला देण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागास या बंगल्यातील काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे, त्यामुळे निवडणूक निकाल लागण्याच्या अगोदरही ते पंतप्रधान निवास सोडून जाऊ शकतात. या बंगल्याचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असून मनमोहन सिंग यांचा नवा पत्ता ३, मोतीलाल नेहरू रस्ता असा असणार आहे. हा बंगला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी फेब्रुवारीत रिकामा केला आहे. त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. डॉ.मनमोहन सिंग व त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांनी फेब्रुवारीतच या बंगल्याला भेट दिली होती. सध्या ते ७, रेसकोर्स रोड येथे राहत आहेत. माजी पंतप्रधानांचे निवासस्थान म्हणून मोतीलाल नेहरू रस्त्यावरील बंगला साडेतीन एकरात असून तेथे जैवविविधता उद्यान आहे. हा बंगला नवीन रंगवला आहे. फरशा व छप्पर तसेच उडालेले प्लास्टर दुरुस्त करण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च करण्यात आले. यापूर्वी शीला दीक्षित या बंगल्यात राहत होत्या. मूल मोझ्ॉक फ्लोअरिंगवर लाकडी फ्लोअरिंग तेथे टाकलेले आहे.  आता लाकडी फ्लोअरिंग काढून मोझ्ॉक फ्लोअरिंग टाकण्यात आले आहे. विशेष सुरक्षा गट म्हणजे एसपीजीने या बंगल्याची पाहणी केली असून हा बंगला मनमोहन सिंग यांना देण्यापूर्वी तेथे काय सुविधा लागतील हे सुरक्षेच्या दृष्टीने सांगितले आहे.
तेथे सीसीटीव्ही कॅमेरे, तपासणी केंद्रे लागणार असून नवीन सुविधांसाठी अडीच लाख रुपये खर्च येणार आहे. दीक्षित या २००४ मध्ये या बंगल्यात आल्या. त्याआधी तेथे दिल्लीचे नायब राज्यपाल राहत होते. एनडीएमसीचे अधिकारी म्हणाले, की बंगल्याच्या आजूबाजूच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ल्युटेन्स भागातील बंगला असल्याने सिंग व त्यांच्या पत्नीस तो आता आजीवन प्राप्त होणार आहे.
 सिंग यांना ७ रेसकोर्स रोड येथे २००४ मध्ये जाताना नूतनीकरणासाठी महिनाभर थांबावे लागले होते. त्या बंगल्यात त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी राहत होते
निवडणूक निकाल लागण्याच्या अगोदरही मनमोहन सिंग पंतप्रधान निवास सोडून जाऊ शकतात. या बंगल्याचे नूतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असून मनमोहन सिंग यांचा नवा पत्ता ३, मोतीलाल नेहरू रस्ता असा असणार आहे. हा बंगला दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी फेब्रुवारीत रिकामा केला आहे.