Amroha Couple Love Story: काही काळापूर्वी पाकिस्तानमधून सीमा हैदर नावाची महिला तिच्या चार मुलांसह नवऱ्याला सोडून भारतात आली होती. नोएडामधील सचिन मीणा नावाच्या तरुणाशी तिने घरोबा केला. अशाच प्रकारची घटना आता उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथे घडली आहे. एका विवाहित महिलेचे इयत्ता बारावीतील मुलावर प्रेम जडले. या प्रेमापोटी सदर महिलेने आपली तीन मुले आणि नवऱ्याला सोडून प्रियकराबरोबर लग्न केले.

आज तकने दिलेल्या बातमीनुसार, अमरोहा येथील सैद नगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. येथील शबनम नावाच्या महिलेचा जीव शेजारी राहणाऱ्या शिवा नावाच्या मुलावर जडला. शिवाबरोबर भावी आयुष्य घालविण्यासाठी सदर महिलेने सामाजिक मर्यादा सोडून पतीला तलाक देत त्याच्यासह मंदिरात लग्न केले.

शिवाशी लग्न केल्यानंतर शबनमने शिवानी असे नवे नाव लावले आहे. लग्नानंतर आम्ही आनंदी आहोत. आता लग्नानंतर आम्हाला कुणीही त्रास देऊ नका, असे आवाहन दोघांनी केले आहे. २६ वर्षीय शबनमचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला पहिल्या पतीपासून तीन मुली झाल्या आहेत. एक वर्षांपूर्वी पतीचा अपघात झाल्यानंतर त्याला दुखापत झाली, तेव्हापासून तो शरीराने कमकुवत झाला.

यादरम्यान शबनम आणि शिवाचे एकमेकांवर प्रेम जडले. काही दिवसांपासून ते दोघे एकत्र राहत होते. त्यानंतर गावातील पंचायतीच्या लोकांनी एकत्र येऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा निर्णय घेतला. शबनमचा तलाक झालेला आहे, त्यामुळे तिला ज्याच्याबरोबर राहायचे आहे, त्याच्याबरोबर राहू दिले पाहिजे, असा निर्णय पंचायतीने दिला. तसेच तीनही मुलींना तिने पहिल्या पतीजवळ सोडले आहे.

Wife Kills Husband in UP
रेल्वे कर्मचारी असलेल्या पतीची पत्नीनेच हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले की, शबनमचे हे तिसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न अलीगढमध्ये झाले होते, मात्र ते लग्न लवकरच मोडले. त्यानंतर तिने अमरोहा येथील व्यक्तीशी दुसरे लग्न केले. या पतीपासून तिला तीन मुली झाल्या. आता तिने शिवा नावाच्या तरुणाशी तिसरे लग्न केले आहे.