डिझेलवर चालणाऱया ‘सेलेरियो’चे मारुती सुझुकीकडून बुधवारी अनावरण करण्यात आले. पेट्रोलवर चालणारी सेलेरिया याआधीच बाजारात उपलब्ध आहे. डिझेल गाडीला २७.६२ किलोमीटर प्रतिलीटर इतके मायलेज असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ‘फिएट’च्या सोबत कंपनीने डिझेल इंजिन तयार केले असून, ते छोटे आणि किफायतशीर आहे.
एकूण चार प्रकारात ही गाडी ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. ज्याची दिल्लीतील एक्सशोरूम किंमत ४.६५ लाखापासून ५.७१ लाख इतकी आहे.
नव्या सेलेरियोची काही वैशिष्ट्ये…
इंजिनाचे वजन ८९ किलो. देशातील सर्वांत हलके कार इंजिन
सनशाईन ग्रे, ब्लेजिंग रेड, सेरुलियन ब्लू, पर्ल आर्कटिक व्हाईट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टनिंग ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध
मागील काचेला वायपर, डीफॉगर, ऑडिओ विथ ब्लूटूथ
सेंट्रल लॉक, चालक आणि चालकाशेजारच्या व्यक्तीसाठी एअरबॅग्ज
अलॉय व्हिल्स, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट
डिजिटल क्लॉक, पुढे आणि मागे पॉवर विंडो
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2015 रोजी प्रकाशित
डिझेलवरील ‘सेलेरियो’ बाजारात, २७ किमी मायलेजचा दावा
डिझेलवर चालणाऱया 'सेलेरियो'चे मारुती सुझुकीकडून बुधवारी अनावरण करण्यात आले.

First published on: 03-06-2015 at 06:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti launches celerio diesel version