भाजपच्या सत्तालालसेमुळे लोकशाही धोक्यात आली असल्याचा आरोप बसपाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे. गोवा, मणिपूर, बिहार आणि आता गुजरात आणि उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडी या मोदी सरकार लोकशाही धोक्यात आणत असल्याचे पुरावे आहेत, असेही मायावती यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपने सत्तालालसेसाठी ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणा आणि सत्ता यांचा गैरवापर केला ते निंदनीय आहे. गुजरातमध्ये केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर केला, असेही त्या म्हणाल्या. लोकशाही चिरडून गोवा, मणिपूरमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर आता बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशांत ज्या घडामोडी घडत आहेत ते अधिकृत यंत्रणेचा गैरवापर केल्याचे उदाहरण आहे, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati democracy bjp
First published on: 30-07-2017 at 02:58 IST