समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचे नातू आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी यांच्या साखरपुडय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीमुळे या दोन्ही पक्षांचे संगनमत असल्याचे दिसत असून, ते सामान्य माणसाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बहुजन समाज पक्षाने म्हटले आहे.
भाजप व समाजवादी पक्ष यांचे अंतर्गत धोरण सारखेच असून, दोघेही राज्याच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत. सपाचे सरकार राज्यातील लोक निर्भयपणे जगत असल्याचा दावा करत असले, तरी सामान्य माणूस भयाच्या वातावरणात जगतो आहे, असे बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस नसीमुद्दीन सिद्दिकी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
गँगस्टर विकी त्यागी याच्यावर तुरुंगाच्या परिसरात झालेला गोळीबार हे उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ढासळली असल्याचे लक्षण असल्याचे मत सिद्दिकींनी व्यक्त केले. बसप आपली राजकीय शक्ती वाढवत असून २०१७ सालची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पक्ष स्वबळावर लढवेल, असेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2015 रोजी प्रकाशित
भाजप व सपाचे संगनमत
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांचे नातू आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी यांच्या साखरपुडय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीमुळे या दोन्ही पक्षांचे संगनमत असल्याचे दिसत असून, ते सामान्य माणसाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बहुजन समाज पक्षाने म्हटले आहे.

First published on: 23-02-2015 at 03:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayawati slams bjp sp