अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद सलाऊद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या आधी भारताला दहशतवाविरोधातल्या रणनीतीत एक मोठे यश मिळाल्याचे मानले जाते आहे. तसेच काश्मीरमध्ये वाढलेल्या हिजबुलच्या वाढत्या दहशतवादी कारवायांचीही दखल अमेरिकेने घेतली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबत भारत अमेरिकेशी जी चर्चा करणार आहे त्याआधीचे हे मोठे यश मानले जाते आहे.

थोड्याच वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. या ऐतिहासिक भेटीवर जगाच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. तसेच या दोन्ही देशांचे नाते किती वेगाने पुढे जाणार? या भेटीत नेमके काय काय होणार याचा सस्पेन्स थोड्याच वेळात संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहचताच ट्रम्प यांनी ट्विट करून चर्चेसाठी उत्सुकता असल्याचे म्हटले आहे. तसेच भारत हा आपला सच्चा दोस्त असल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले.

या दोन नेत्यांच्या बैठकीत काय होणार, या बैठकीचे फलित काय? याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आत्तापर्यंत तीनवेळा फोनवरून चर्चा झाली आहे. मात्र आता थोड्याच वेळात हे दोन्ही नेते भेटणार आहेत. आधी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची भेट होईल. त्यांच्यात चर्चा होईल त्यानंतर हे दोन्ही नेते भेटणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये डिनर करणार आहेत. या नंतर या नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

भारताचे मुद्दे काय असतील?
एच १ बी व्हिसा प्रक्रिया सोपी करणे
अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांची सुरक्षा
पाकिस्तानची आर्थिक रसद आणि मदत बंद करणे
दहशतवादाविरोधात संयुक्त कारवाई
वन बेल्ट वन रोड योजनेविराधात विशेष रणनीती
जलवायू कराराचे अमेरिकेकडून पालन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका काय मुद्दे मांडेल?
दक्षिण चीन सागर वादात चीनविरोधात अमेरिकेची मदत
चीनच्या वन बेल्ट वन रोड विरोधातली नीती
तालिबानी दहशतवाद्यांविरोधात भारताची मदत
कतार आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्यांच्या बाबत भारताची मदत
जलवायू करारात हवी असलेली सूट