भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांकडे माध्यमांचे संपूर्ण लक्ष असते आणि काँग्रेसच्या सभांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येते असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी केला आहे.
अहमद म्हणाले, “दिल्लीत रविवारी काँग्रेसचे प्रशासन असलेल्या पाच राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या सभा होत्या. पण, माध्यमांकडून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचीच सभा प्रसारित करण्यात आली. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ आणि हरियाणा या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या. तरीही माध्यमांकडून मोदींचीच सभा दाखविण्यात आली.”
दिल्लीत काँग्रेसचे बडे नेते नागरिक जाब विचारतील म्हणून सभा घेत नाहीत या मोदींच्या टीकास्त्रावर बोलताना अहमद म्हणाले, “सोनिया गांधी यांची दिल्लीत एक सभा झाली असून राहुल गांधी यांच्याही काही सभा झाल्या आहेत. काँग्रेसने दिल्लीत प्रचारासाठी पूर्ण जोर लावला आहे.” 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Media covering only modi ignoring congress leaders shakeel ahmed
First published on: 02-12-2013 at 11:27 IST