तेलंगणात ‘मेडिसिन फ्रॉम द स्काय’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि तेलंगणाचे मंत्री के टी रामाराव यांची उपस्थिती होती. या योजनेच्या माध्यमातून ड्रोन वापरून दुर्गम भागात लस आणि आवश्यक वस्तू पोहोचवता येणार आहेत.
“आजचा दिवस केवळ तेलंगणाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अतिशय क्रांतिकारी दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ड्रोन धोरण तयार करण्यात आले आहे. तीन महिन्यांनंतर याचं विश्लेषण केले जाईल. त्यानंतर विमान मंत्रालय, आयटी मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, राज्य सरकार आणि केंद्र मिळून संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करतील.”, असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं.
Today we launched the ‘Medicine from the Sky’ project in Vikarabad (Telangana). Under this project, vaccines and medicines will be made available to remote areas with the help of drones: Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia in Hyderabad pic.twitter.com/PsBELzyYTE
— ANI (@ANI) September 11, 2021
पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना तेलंगणाच्या १६ ग्रीन झोनमध्ये सुरू करण्यात आली आहे. नंतर ही योजना संपूर्ण देशात सुरू केली जाणार आहे.
#WATCH | Telangana: The ‘Medicine from the Sky’ project, which will help deliver medicines and vaccines to remote areas with the help of drones, was launched in Vikarabad today.
It can carry four types of boxes and each of these boxes can maintain a different temperature. pic.twitter.com/45VHSMiKPa— ANI (@ANI) September 11, 2021
“विमानतळ, धोरण आणि सुधारणांशी संबंधित १६ मुद्यांचा समावेश असलेला १०० दिवसांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एअर टॅक्सी आणि स्काय टॅक्सी हे देशाचे भविष्य आहे. २०३० पर्यंत भारत ड्रोनची राजधानी होईल अशी अपेक्षा आहे.”, असं केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं.