आपल्या सौरमालेतील शुक्र, गुरु, मंगळ, बुध आणि शनी पाच महत्त्वाचे व प्रकाशमान ग्रह २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान एका सरळ रेषेत दिसणार असून, अशी अवस्था २००५ नंतर प्रथमच येत आहे. मेलबर्नच्या स्विनबर्न विद्यापीठाचे संशोधक डॉ. अॅलन डफी यांनी सांगितले की, हे ग्रह सरळ रेषेत येण्याची स्थिती वेगळी आहे. सर्व ग्रह सपाट प्रतलात येत असले तरी त्यांचे वार्षिक चक्र वेगळे आहे. त्यामुळे या ग्रहांचे सरळ रेषेत येणे महत्त्वाचे आहे. मेलबर्न तारांगणाच्या डॉ. तान्या हिल यांनी सांगितले की, हे ग्रह पुन्हा ऑगस्टमध्ये सरळ रेषेत येणार असून त्यानंतर मात्र ते ऑक्टोबर २०१८ मध्ये सरळ रेषेत येतील. बुधवारी म्हणजे २० जानेवारीपासून खगोलनिरीक्षकांसाठी ही पर्वणी असून सकाळी ५.३० ते ५.४० दरम्यान सूर्योदयापूर्वी ऑस्ट्रेलियात हे दृश्य जास्त चांगले दिसणार आहे. शुक्र व गुरू हे समजण्यास सहज सोपे आहेत, मंगळ लालसर रंगाचा ठिपका असेल पण तो फार प्रखर दिसणार नाही. बुध ग्रह क्षितिजाच्या खूप जवळ असल्याने तो फार कमी काळ दिसेल, कारण लगेच सूर्योदय होणार असल्याने तो थोडा काळ दर्शन देईल. गडद रात्रीच या ग्रहांची अवस्था जास्त चांगली दिसेल, त्यामुळे प्रकाशाचे प्रदूषण नसलेल्या ठिकाणी जाऊन ते पाहावे लागेल. पहिल्यांदा तुम्हाला हे ग्रह दिसले नाहीत तरी प्रयत्न सोडू नका, पुन्हा पुन्हा जाऊन बघा. क्षितिज व काळे आकाश बघून निरीक्षणासाठी जागा निवडा. क्षितिजाच्या रेषेत तुमचा हात चंद्राच्या दिशेने वर उचला, त्या रेषेत तुम्हाला हे सगळे ग्रह दिसतील.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2016 रोजी प्रकाशित
पाच ग्रह बुधवारपासून महिनाभर एका रेषेत, दुर्बिणीशिवाय दिसणार
क्षितिजाच्या रेषेत तुमचा हात चंद्राच्या दिशेने वर उचला, त्या रेषेत तुम्हाला हे सगळे ग्रह दिसतील.

First published on: 18-01-2016 at 18:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury venus mars jupiter and saturn five planets visible from earth