जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल आणि त्यात जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, विंडोज 7 चे कम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत. प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ (Windows 7) चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढील वर्षी 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. म्हणजे याचे अपडेट्स मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे. या दोन्हीमुळे कम्प्युटरची सुरक्षा होत असते. जर ही सुविधा सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. मायक्रोसॉफ्टने गेल्यावर्षीच्या जून महिन्यातच विंडोज 7 चा अधिकृत फोरम सपोर्ट बंद केला होता.

7 जुलै 2009 रोजी मायक्रोसॉफ्टने Windows 7 सादर केलं होतं. विंडोज 7 नंतर Windows 8 , Windows 8.1 आलं, आणि त्यानंतर जुलै 2015 मध्ये कंपनीने Windows 10 आणलं. सध्या विंडोज 10 वापरणाऱ्यांची संख्या 70 कोटींहून अधिक आहे.

आता कंपनी Windows 7 Extended Security Updates विकणार आहे यासाठी पैसे मोजावे लागतील. कारण इंटरप्राइजेस युजर्स अनेक वर्षांपासून विंडोज 7 चा वापर करत आहेत, त्यामुळे याचा वापर एकदम बंद करणं त्यांच्यासाठी कठीण आहे. पण, सामान्य ग्राहकांना हे अपडेट मिळणार नाहीत हे देखील कंपनीने स्पष्ट केलंय. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft to stop support for windows
First published on: 16-01-2019 at 14:34 IST