Fighter Plane Crash in Rajasthan : राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळून दोन वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (२८ जुलै) रात्री ९ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर मिग-२१ या लढाऊ विमानातील दोन्ही वैमानिकांचा शोध सुरु होता.

हेही वाचा >> BJP worker murder: आम्ही मुस्लीम असल्याने लक्ष्य केलं जातंय, आरोपीच्या वडिलांचा दावा

Chandrapur, Railway Police, Arrest 14 Ticket Brokers, Black Marketing Tickets, wani, bhadrwati, ghugus, railway ticket black market, chandrapur railway ticket black, e ticket black,
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या १४ दलालांना अटक; चंद्रपूर, घुग्घुस, येथे कारवाई
salman khan off to dubai_cleanup
Video: घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानने पहिल्यांदाच सोडली मुंबई, विमानतळावरील व्हिडीओ आले समोर
kalyan railway station crime news,
कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले
navy deployed 11 submarines in indian ocean
विश्लेषण : एकाच वेळी ११ पाणबुड्या हिंद महासागरात तैनात… भारतीय नौदलाचे चीनवर लक्ष?

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमधील बडमेर जिल्ह्यात भारतीय हवाई दलातील मीग- २१ लढाऊ विमान कोसळले. या विमानात दोन वैमानिक होते. हा अपघात एवढा भीषण होता की कोसळल्यानंतर विमानाने जागेवरच पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे भाग अक्षरश: विखुरले होते. या घटनेची माहिती होताच येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.

हेही वाचा >> “माझ्याशी बोलू नका,” लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणींमध्ये जोरदार खडाजंगी, सुप्रिया सुळेंना करावी लागली मध्यस्थी

या घनटेची दखल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील घेतली आहे. त्यांनी हवाई दलप्रमुख व्ही आर चौधरी यांच्याशी संवाद साधून अपघाताचे कारण तसेच इतर विचारणा केली. दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला असून या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे.