पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काश्मीर दौऱयाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी सोमवारी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला. या हल्ल्यात तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. श्रीनगर शहराबाहेर असलेल्या बेमिनाजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लष्कराच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
तीन जवानांना गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार केल्यानंतर दहशतवादी काळ्या रंगाच्या काचा असलेल्या एका गाडीतून पळून गेले. घटनास्थळी येण्यासाठी काही दहशतवाद्यांनी मोटारसायकलचा वापर केला होता. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेनंतर लगेचच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येतो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jun 2013 रोजी प्रकाशित
श्रीनगरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, तीन जखमी
पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काश्मीर दौऱयाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी सोमवारी लष्कराच्या जवानांवर गोळीबार केला.

First published on: 24-06-2013 at 06:26 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Militants attack army convoy in srinagar ahead of pms visit 3 jawans injured