काश्मीरमध्ये तापमान गोठणबिंदूजवळ ; खोऱ्यातील सर्वात थंड ठिकाण पहलगाम

खोऱ्यात नेहमीपेक्षा लवकर थंडीची स्थिती निर्माण झाली होती, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यातील थंडीचा पर्यटक आनंद घेत आहेत.

कुपवाडामध्येही उणे तापमान

श्रीनगर : संपूर्ण काश्मीर खोऱ्यात रात्रीचे तापमान वाढले असून श्रीनगरमध्ये बुधवारी आठवडय़ाभरानंतर प्रथमच किमान तापमान गोठणबिंदूच्या वर स्थिरावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोऱ्यात नेहमीपेक्षा लवकर थंडीची स्थिती निर्माण झाली होती, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्री ०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, जे आदल्या रात्री उणे २.३ अंश सेल्सिअस होते. पहलगाममध्ये उणे २ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पहलगाम हे काश्मीरमधील सर्वात थंड ठिकाण होते.

उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे पारा उणे ०.३ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. काश्मीर खोऱ्याचे प्रवेशद्वार असलेल्या काझीगुंड येथे उणे ०.६ अंश सेल्सिअस

तापमान नोंदवले गेले, तर दक्षिणेकडील कोकरनाग येथेही उणे ०.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. या महिनाअखेपर्यंत हवामान कोरडे पण थंड राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गुरुवार, २५ नोव्हेंबर रोजी उत्तर काश्मीरमध्ये काही भागात हलकी बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे त्यात म्हटले आहे.

साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात काश्मीरमध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीला सुरुवात होते, मात्र या वर्षी ती स्थिती लवकरच सुरू झाली आहे. ‘चिल्लई कलान’, काश्मीरमधील कडाक्याच्या थंडीचा २० दिवसांचा कालावधी दरवर्षी २१ डिसेंबरपासून सुरू होतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minimum temperatures near freezing point in kashmir zws

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या