Miss Kerala स्पर्धेच्या विजेत्या आणि उपविजेत्या मॉडेलचा भीषण अपघातात मृत्यू; दोघीही जागीच ठार

अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला असून डॅशबोर्ड खालील कप्प्यांतून कागदपत्रही पोलिसांना काढता आले नाहीत.

Accident 2 dead
या अपघातामध्ये इतर दोघेजण जखमी झालेत. (फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार डावीकडे अनसी, मध्यभागी अपघातग्रस्त कार आणि उजवीकडे डॉ. अंजना)

केरळमधील कोच्ची येथे झालेल्या एका भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी पहाटेच्या सुमारास घडलाय. समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये मिस केरळ २०१९ स्पर्धा जिंकणारी २५ वर्षीय अनसी काबीर आणि याच स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावणारी डॉ.अंजना शाहजान या दोघांची मृत्यू झालाय.

समोर आलेल्या एका दुचाकीला चुकवण्याच्या नादात या दोघी प्रवास करत असणाऱ्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये त्यांच्यासोबत इतर दोन जणंही प्रवास करत होते. या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर तिरुअनंतपुरम मधील एका रस्त्यावर हा अपघात घडला. अचानक समोर आलेल्या दुचाकीला होणारी धडक टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यामध्ये गाडीतील दोघी जागीच ठार झाल्या तर इतर दोघे गंभीर जखमी झालेत.

आयएएनएस या वृत्तसंस्थेला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे उद्धवस्त झालाय. गाडीच्या डॅशबोर्ड खालील कप्प्यांमधून गाडीचे कागदपत्रही आम्हाला काढता आले नाही, असं पोलीस म्हणालेत. या अपघातामध्ये ब्यूटी क्वीन असणाऱ्या दोन तरुणींचा घटनास्थळीच दूर्देवी अंत झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

या फोर्ड फिगो गाडीमध्ये असणाऱ्या इतर दोघांना दुखापत झाली असून एकाची प्रकृती फारच चिंताजनक आहे. त्या व्यक्तीला जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे, असं पोलिसांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. अनसी आणि अंजना या दोघींनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाला तेव्हा सीटबेल्ट लावलेले होते की नाही ते फॉरेन्सिक तपास आणि सखोल तपासानंतरच स्पष्ट होईल असं पोलीस म्हणालेत. सध्या या प्रकरणामध्ये रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Miss kerala ansi kabeer and runner up anjana shajan both die in a car accident near kochi scsg