मिसिसिपी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामांना विषारी द्रव्य लावलेले धमकी पत्र पाठवल्याच्या आरोपाची कबुली दिली आहे. जेम्स डयुश्के या आरोपीने बराक ओबामा, सिनेटर रॉजर विकर व मिसिसिपीच्या न्यायाधीशांना रिसीन हा विषारी पदार्थ लावलेले पत्र पाठवले होते. डय़ुश्केला आता अभियोक्तयांशी झालेल्या कबुलीपत्राच्या करारानुसार २५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होईल. पोलिसांनी या प्रकरणात त्याच्याच सारख्या दुसऱ्या व्यक्तीला पकडले होते पण नंतर डय़ुश्के हाच खरा गुन्हेगार असल्याने त्याला पकडण्यात आले. डय़ुश्के याला ३०० महिने तुरुंगात काढावे लागतील असे न्याय विभागाने म्हटले आहे. त्याने आरोप मान्य केल्यानंतर आता त्याला येत्या साठ दिवसांनी शिक्षा सुनावली जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
ओबामांवर ‘पत्रास्त्र’पाठवणाऱ्याची गुन्हा कबुली
मिसिसिपी येथील ४१ वर्षीय व्यक्तीने अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामांना विषारी द्रव्य लावलेले धमकी पत्र पाठवल्याच्या आरोपाची कबुली दिली आहे.
First published on: 19-01-2014 at 04:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mississippi man pleads guilty to sending ricin laced letters to president obama