नवी दिल्ली : ‘‘आणीबाणी तर ५० वर्षांपूर्वीच संपली पण, गेली ११ वर्षे मोदी सरकारची अघोषित आणीबाणी सुरू आहे. त्याविरोधात काँग्रेसने भारत जोडो न्याय यात्रा काढल्यामुळे केंद्र सरकारचे धाबे दणाणले. दशकभरातील सरकारचे अपयश लपवण्यासाठी मोदी सरकार आणि भाजप संविधान हत्या दिन पाळण्याचे नाटक करत आहे,’’ अशी परखड टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता आणीबाणीविरोधात भूमिका घेत असला तरी, तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींना पत्र लिहून स्वत:चा बचाव केला होता, अशीही कोपरखळीही खरगेंनी मारली. संघाने आणीबाणीचे समर्थन करणारे पत्र इंदिरा गांधींना पाठवले होते, असा संदर्भ काही काँग्रेस नेत्यांनी दिला. आणीबाणीच्या काळातील वैयक्तिक अनुभवावर आधारित मोदींचे ‘द इमर्जन्सी डायरीज’चे पुस्तक प्रकाशित होत असल्याची माहिती बुधवारी मोदींनी ‘एक्स’वरून दिली. या पुस्तकामध्ये सरसंघचालकांनी पाठवलेल्या पत्राचा समावेश मोदींनी केला आहे का, असा खोचक प्रश्न खरगेंनी यावेळी विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणीबाणीची चूक सुधारण्यासाठी स्वत: इंदिरा गांधींनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंना संविधानामध्ये दुरुस्ती करण्याला पाठिंबा दिला होता. आणीबाणीसंदर्भातील तरतूद वगळण्यात आली. पण, ज्यांनी स्वांतत्र्यलढ्यात भाग घेतला नाही, संविधान तयार करण्यात ज्यांचा सहभाग नव्हता ते आम्हाला संविधान कसे वाचवले पाहिजे याचे धडे देत आहेत. मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस