दिल्लीमध्ये गेल्या काही तासांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तब्बल २० हजार घरं क्वारंटाइन केल्याची माहिती दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी दिली. तसंच त्यांनी पोलिसांना या घरावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासही सांगितलं आहे.

दरम्यान, सोशल डिस्टंन्सिंग योग्यरित्या लागू करण्यासाठी बैजल यांनी भोजन वितरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती संख्या आता ५०० वरून २ हजार ५०० करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्य सचिव विजय कुमार देव आणि पोलीस आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधला. तसंच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, याबाबत चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सोशल डिस्टंन्सिंग योग्यरित्या राबवण्यासाठी भोजन केंद्रांची संख्या ५०० वरून वाढवून २ हजार ५०० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच होम क्वारंटाइनवरही नजर ठेवली जात आहे. होम क्वारंटाइनसाठी २० हजार घरं निश्चित करण्यात आली आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं. “काही ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग पाळलं जात नसल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे ही केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग आणि होम क्वारंटाइनचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी,” असंही आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.