सलग २०व्या दिवशी युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरूच आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनमधून भारतात परततेल्या नागरिकांबद्दल राज्यसभेत निवेदन दिले आहे. कठीण परिस्थितीतही आम्ही आमच्या २२५०० हून अधिक विद्यार्थ्यांना भारतात परत आणले आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चर्चा करत होतो पण आमच्यासमोर आव्हान होते की आमच्या नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित ठेवणे. हे लक्षात घेऊन भारत सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले. एवढे मोठे ऑपरेशन अशा परिस्थितीत पार पाडणे कठीण होते, असे एस जयशंकर यांनी म्हटले आहे.

फेब्रुवारीमध्ये युक्रेन सोडण्यास सांगितले – एस जयशंकर

“भारतीय दूतावासाने १५, २० आणि २२ फेब्रुवारी रोजी विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले होते. सतत सल्ला देऊनही मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथून बाहेर पडत नव्हते. आपला अभ्यास अपूर्ण राहू नये ही भीती त्याच्या मनात होती. जेव्हा परिस्थिती बिघडली तेव्हा १८००० हून अधिक भारतीय विद्यार्थी तेथे अडकले होते, ही बाब लक्षात घेऊन भारतासह युक्रेनमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात आले. खराब वातावरणामुळे विमानतळ बंद होते. ल्युकेन्स मुख्यालयातच शेजारील देशांच्या सीमेवरून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी शेजारील देशांच्या सीमेवर पाठवण्यात आले,” अशी माहिती परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

पंतप्रधानांच्या सूचनेनुसार ऑपरेशन गंगा सुरु

“पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, आम्ही ऑपरेशन गंगा सुरु केले आणि संघर्षाच्या परिस्थितीत सर्वात आव्हानात्मक कार्य पार पाडले. आमचे लोक संपूर्ण युक्रेनमध्ये होते. ते स्वतः लष्करी आव्हानांना तोंड देत होते. या मोहिमेचा आढावा स्वत: पंतप्रधान मोदींनी रोज घेतला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये, आम्ही दररोज २४ तास भारतीयांना बाहेर काढण्यासाठी योजना आखत होता. आम्हाला नागरी विमान वाहतूक मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, एनडीआरएफ, हवाई दल, खाजगी विमान सेवा यासह सर्व संबंधित मंत्रालये आणि संस्थांकडून उत्कृष्ट समर्थन मिळाले, असेही एस जयशंकर म्हणाले.

“ऑपरेशन गंगा अंतर्गत ९० उड्डाणे चालवण्यात आली आहेत, त्यापैकी ७६ नागरी उड्डाणे आणि १४ वायुसेनेची उड्डाणे आहेत. रोमानिया, पोलंड, हंगेरी आणि स्लोव्हाकिया येथून विमाने भारतात आली. अर्ध्याहून अधिक विद्यार्थी पूर्व युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये होते, जो भाग रशियाच्या सीमेवर आहे आणि आतापर्यंत संघर्षाचे मुख्य केंद्र आहे. युक्रेनमधून ३५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे,” असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी अनेक वेळा संवाद साधला. त्यांनी विशेषतः खार्किव आणि सुमी येथून भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा मुद्दा उचलून धरला होता. पंतप्रधानांनी रोमानिया, स्लोव्हाक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंडच्या पंतप्रधानांशी भारतीयांच्या त्यांच्या देशात प्रवेश करण्याच्या सुविधेसाठी समर्थन मिळविण्यासाठी संवाद साधला होता. पंतप्रधानांनी ऑपरेशन गंगासाठी चाक केंद्रीय मंत्र्यांना रोमानिया, हंगेरी, स्लोव्हाक रिपब्लिक आणि पोलंड येथे विशेष दूत म्हणून नियुक्त केले. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानिया, किरेन रिजिजू हे स्लोव्हाक रिपब्लिक, हरदीप सिंग पुरी हे हंगेरी आणि जनरल व्हीके सिंग ते पोलंडमध्ये होते,” असे परराष्ट्रमंत्री म्हणाले.