मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1.१० रुपयांच्या वादावरून दादरमध्ये भाजी विक्रेत्याने केला ग्राहकाचा खून

मुंबईतील दादर या रेल्वे स्थानकाबाहेर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका भाजी विक्रेत्याने ग्राहकाचा खून केला. वाचा सविस्तर..

2…तर मिशाच नाही भुवयाही काढून फिरेन-उदयनराजे भोसले

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर आक्षेप घेत निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचं आवाहन केलं आहे. वाचा सविस्तर..

3. “जय श्री राम” घोषणा दिली नाही म्हणून धावत्या ट्रेनमधून फेकले बाहेर

“जय श्री राम”च्या घोषणा दिल्या नाही म्हणून एका गटाने आपल्याला मारहाण करुन धावत्या ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले असा आरोप पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या हाफिझ मोहम्मद शाहरुख हल्दर (२६) यांनी केला आहे. वाचा सविस्तर..

4.WC 2019 : भारतासोबतच्या पराभवानंतर आत्महत्येचा विचार मनात होता-पाक क्रिकेट कोच

विश्वचषक स्पर्धेतील क्रिकेट सामन्यात भारताने जेव्हा पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा मला आत्महत्या करावीशी वाटली होती. हा खुलासा केला आहे पाकिस्तानी क्रिकेट टीमचे कोच मिकी आर्थर यांनी. वाचा सविस्तर..

5. अभिजित बिचुकलेंविरोधातली तक्रार मागे!

बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या आणि वादग्रस्त वक्तव्यं करणाऱ्या अभिजित बिचुकलेला खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर..

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morning bulletin important city sports and entertainment news ssv
First published on: 25-06-2019 at 09:38 IST