सकाळी 9.30 पर्यंत कार्यालयात हजर राहा; पंतप्रधानांचे मंत्र्यांना निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्वत:च्या कार्यशैलीचे उदाहरण दिले

दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपल्या निवासस्थानातून काम न करण्याचा सल्ला देच संसदेच्या अधिवेशनादरम्यान कोणताही दौरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाचा सविस्तर…

गुजरातमधील २ लाख १५ हजार नागरिक सुरक्षितस्थळी

वायू चक्रीवादळ गुरुवारी गुजरातच्या काही भागांमध्ये धडकण्याची अपेक्षा असून, त्याच्या परिणामांना तोंड देण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. सागरी किनाऱ्यावरील सुमारे २.१५ लाख लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रांतील सखल भागात राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याचे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून या भागांतील बंदरे आणि विमानतळांवरील परिचालन स्थगित करण्यात आले आहे. वाचा सविस्तर…

राज्यातील आमदारांना दरमहा दोन लाखांपेक्षा अधिक वेतन व भत्ते

खासदार आणि आमदारांच्या वेतनाबद्दल नेहमीच चर्चा होत असते. खासदार-आमदारांना मिळणारे वेतन व भत्ते हे जास्त असल्याचा सामान्य नागरिकांचा आक्षेप असतो. त्याच वेळी लोकप्रतिनिधींना मात्र हे वेतन व भत्ते कमीच वाटतात. प्रत्येक अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांकडून भत्ते आणि आमदार निधीत वाढ करण्याची मागणी केली जाते. राज्यात सध्या मिळणारे वेतन व भत्ते हे ऑगस्ट २०१६ पासून लागू झाले आहेत. पुढील सोमवारपासून सुरू होणारे विद्यमान विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. वाचा सविस्तर…

अनपेक्षीत! ‘तुझ्यात जीव रंगला’मधून राणाची एक्झिट?

‘चालतंय की’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पहिलवान गडी राणादा सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना राणाने वेड लावल आहे. या मालिकेतील राणा आणि पाठकबाई या जोडीमध्ये प्रेक्षकांचा जीव गुंतलाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. वाचा सविस्तर…

धवनची दुखापत, पावसाची भारताला चिंता!

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत अपराजित असलेले संघ म्हणजे भारत आणि न्यूझीलंड. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शिखर धवनच्या डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो किमान तीन सामने खेळू शकणार नाही. त्याचबरोबर ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयरथ पाऊस रोखणार, अशी चिन्हे दिसत आहेत. वाचा सविस्तर…