जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं आहे. पुनर्विकसित करण्यात आलेल्या या मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.

“नरेंद्र मोदींनी जे स्वप्न बघितलं ते पूर्ण झालं”

उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्टेडियमचं वेगळेपण अधोरेखित केलं. त्याचबरोबर हे नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झालं आहे, असं शाह यांनी सांगितलं. “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी अशा प्रकारच्या स्टेडियमचं स्वप्न बघितलं होतं, जे आज पूर्ण झालं आहे. या नवं स्टेडियम जगातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स्टेडियमच्या आधारवर विकसित करण्यात आलेलं आहे. मोदी यांच्यासोबत खुप वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी तरुणांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केलं आहे,” असं शाह यांनी यावेळी सांगितलं.

२४ फेब्रुवारी २०२० रोजी याच स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्ताने नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. होतं. मोटेरा स्टेडियमध्ये सर्व अत्याधुनिक प्रकारच्या सेवा उपलब्ध असून, पूर्वीच्या स्टेडियममध्ये ५३ हजार प्रेक्षक बसू शकत होते. त्याचा पुनर्विकास करण्यात आल्यानंतर या स्टेडियम आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motera stadium ahmedabad gujarat worlds largest cricket stadium renamed as narendra modi stadium bmh
First published on: 24-02-2021 at 13:20 IST