नागपूर : केंद्रातील मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस नागपूरची जागा लढवत आहे. काँग्रेसने यावेळी आणखी उमेदवार बदलला आहे.

गडकरी २०१४ मध्ये काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याविरुद्ध पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढले आणि विजयी झाले. त्यानंतर २०१९ मध्ये काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नागपुरातून उमेदवारी दिली. त्यांचाही पराभव झाला. आता आमदार विकास ठाकरे हे नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढत आहे. लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे सांगून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

MLA Jayant Patil held 103 meetings in the Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीत आ. जयंत पाटील यांनी घेतल्या तब्बल १०३ सभा
snake, snake went over sharad pawar's body, sharad pawar became chief minister, supriya sule, shirur lok sabha seat, supriya sule public meeting, manchar, amol kolhe, ncp sharad pawar,
अंगावरून साप गेला आणि आठ दिवसांनी शरद पवार मुख्यमंत्री झाले; सुप्रिया सुळे यांनी सांगितली ‘ती’ आठवण
Ajit Pawar, mother, Ajit Pawar latest news,
माझी आई माझ्यासमवेत, अजित पवार असे का म्हणाले?
Sharad Pawar, vote, Malegaon,
शरद पवार यांचे मुंबईऐवजी माळेगाव येथे मतदान
amit shah on Muslim vote bank politics
उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लीम मतपेढीचे राजकारण; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे टीकास्त्र 
Rahul Gandhi to hold rally for Congress candidate in Pune
पुणे : ‘नरेंद्र मोदींकडून राजकारणाची चेष्टा’, रवण्णा प्रकरणावरून राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका
Jayant Patil, public money, GST,
जनतेच्या पैशांची जीएसटीच्या माध्यमातून लूट, जयंत पाटील यांचा आरोप
Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट…”

हेही वाचा – “पक्षनिष्‍ठा आमचे भांडवल, कमजोरी नव्‍हे,” भाजपचे नेते तुषार भारतीय यांचा नवनीत राणांविरोधात सूर; म्हणाले…

हेही वाचा – बार्टी, सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात! प्रशिक्षणासाठी आठ खासगी संस्थांची निवड होणार

महाविकास आघाडीचे नेते नागपुरात काँग्रेसच्या उमेदवारासोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांचे सोमवारी नागपूरला आगमन झाले. वर्धा लोकसभेची जागा शरद पवार गटाकडे गेली आहे. तेथे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहे. आज काळे यांनी अर्ज भरला. त्यावेळी शरद पवार उपस्थितीत होते. वर्ध्याकडे रवाना होण्यापूर्वी काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार आणि नितीन गडकरी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गडकरी हे शरद पवार यांना राजकारण, समाजकारण आणि विकास मुद्यांवर मार्गक्रमण करीत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर गडकरी विरुद्ध लढत असलेल्या ठाकरे यांना शरद पवार यांचा कानमंत्र महत्वाचा ठरतो. विकास ठाकरे आणि शरद पवारांनी सुमारे तासभर चर्चा केली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील शरद पवार यांच्यासोबत होते.