नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारला दिल्लीतल्या बी.डी. रोड या ठिकाणी अपघात झाला आहे. या कार अपघातात हेमंत गोडसे यांच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातातून सुदैवाने हेमंत गोडसे आणि त्यांच्यासह असलेले सहकारी बचावले आहेत. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिकचे खासदार दिल्लीतल्या बी. डी. मार्गावरुन चालले होते. त्याचवेळी हा अपघात झाला. कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हेमंत गोडसे आणि त्यांचे सहकारी या अपघातातून बचावले आहेत. दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी हेमंत गोडसे हे महाराष्ट्र सदनात येत असतात. त्यानुसार ते दिल्लीत येत होते. मात्र त्यांच्या कारला आज अपघात झाला आहे.
अपघात नेमका कसा झाला?
खासदार हेमंत गोडसे यांची कार एका कारला ओव्हरटेक करत होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली आणि हा अपघात झाला. कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या अपघातात झालं आहे.हेमंत गोडसे हे त्यांच्या MH 15 FC 9909 या इनोव्हाने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या कारला अर्टिगा 7 CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. यामुळे कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मात्र सुदैवाने गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठी दुखापत झाली नाही.
आज देशभरात शिवजयंतीचा उत्साह आहे. राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. नाशिकचं ढोल पथक या शिवजयंती सोहळ्याला दरवर्षी उपस्थित असतं. महाराष्ट्र सदनात या ढोलपथकाचं वादन असतं. याच कार्यक्रमाला हेमंत गोडसे जात होते त्यावेळी हा अपघात झाल्याची माहितीही समोर येते आहे.