आशियातील श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्यासोबत १०० अब्ज डॉलर्सच्या संपत्ती असलेल्या समुहात सहभागी झाले आहेत. या यादीत मुकेश अंबानी ११ व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २३.८ अब्ज डॉलर्सची भर पडली. ताज्या आकडेवारीनुसार त्यांची संपत्ती १००.१ अब्ज डॉलर्स आहे.

१०० अब्ज डॉलर्स संपत्ती असलेल्या व्यक्ती

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
  • एलन मस्क- २२२ अब्ज डॉलर्स, (टेस्ला, स्पेस एक्स)
  • जेफ बेजोस- १९१ अब्ज डॉलर्स (अ‍ॅमेझॉन)
  • बर्नार्ड अर्नाट- १५६ अब्ज डॉलर्स (LVMH)
  • बिल गेट्स- १२८ अब्ज डॉलर्स (मायक्रोसॉफ्ट)
  • लॅरी पेज- १२५ अब्ज डॉलर्स (गुगल)
  • मार्क झुकरबर्ग- १२३ अब्ज डॉलर्स (फेसबुक)
  • सर्जी ब्रिन- १२० अब्ज डॉलर्स (गुगल)
  • लॅरी एलिसन- १०८ अब्ज डॉलर्स (ऑरॅकल)
  • स्टीव वाल्मर- १०६ अब्ज डॉलर्स (मायक्रोसॉफ्ट)
  • वॉरेन बफेट- १०३ अब्ज डॉलर्स (बर्कशायर हॅथवे)
  • मुकेश अंबानी- १००.१ अब्ज डॉलर्स (रिलायन्स)

पंजाबमध्ये सत्तांतराची शक्यता, काँग्रेसमधील वादाचा फायदा ‘या’ पक्षाला, एबीपी-सीवोटर सर्वेक्षण काय म्हणतं?

६४ वर्षीय मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची कमान हाती घेतल्यानंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील एनर्जी, रिटेल, ई कॉमर्स सेक्टरमध्ये चांगली कामगिरी केली. २०१६ मध्ये टेलिकॉम सेक्टरमध्ये उतरत त्यांनी भारतीय बाजारावर चांगली पकड मिळवली आहे. आता त्यांची नजर ग्रीन एनर्जीवर आहे. यावर्षी जून महिन्यात याबाबतची घोषणा त्यांनी केली होती. येत्या ३ वर्षात या सेक्टरमध्ये ते १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत.