जगातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्थान मिळवलं आहे. महत्वाचं म्हणजे Hurun Global Rich List 2022 मध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय आहेत. पण संपत्ती वाढण्याच्या बाबतीत बोलायचं गेल्यास गौतम अदानी यांना बाजी मारली आहे. त्यांच्या संपत्तीत दिवसाल कोट्यवधींची वाढ होत आहे.

अंबानींची संपत्ती १०३ अरब डॉलर

हुरुनच्या यादीनुसार, मुकेश अंबानींची संपत्ती (Mukesh Ambani Net Worth) जवळपास १०३ अरब डॉलर आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत २० अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. यासोबतच जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या १० जणांच्या यादीत ते नवव्या क्रमांकावर आहेत. याचाच अर्थ ते सर्वात श्रीमंत भारतीय असून देशात पहिल्या क्रमांकावर आहेत.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Toronto airport cargo facility Heist
कॅनडामध्ये ‘मनी हाइस्ट’ प्रमाणे सर्वात मोठी चोरी; भारतीय वंशाच्या आरोपींनी ४०० किलो सोने पळविले
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Best Coworking Spaces in Pune
कार्यालयीन जागा सहकार्यात पुणे देशात आघाडीवर

अदानींच्या संपत्तीत रोज कोटींची वाढ

या यादीत गौतम अदानी यांचं नाव १२ व्या क्रमांवर असलं तरी गेल्या एका वर्षात त्यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Net Worth) ८१ अरब डॉलर आहे. बिजनेस टुडेनुसार, गेल्या एक वर्षात त्यांच्या संपत्तीत ४९ अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. याचाच अर्थ त्यांची संपत्ती दिवसाला कोट्यवधींनी वाढली आहे

एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर

श्रीमंतांच्या यादीत (World Top-10 Richest Persons List) टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती २०५ अरब डॉलर्स आहे. तर अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस या यादीत १८८ अरब डॉलर संपत्तीसहित दुसऱ्या क्रमांकावर आहेत.