जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या लिव्हरपूलला लवकरच नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. ‘द मिरर’च्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी लिव्हरपूल क्लब खरेदी करण्याासाठी इच्छूक असून त्यासंदर्भात त्यांनी विचारणा केली असल्याची माहिती आहे. सध्या लिव्हरपूलची मालकी फेनवे स्पोर्ट्स ग्रुपकडे असून त्यांनी ऑक्टोबर २०१० मध्ये हा क्लब खरेदी केला होता. दरम्यान, फेनवे स्पोर्ट्स ग्रुप हा क्लब विकण्याच्या तयारीत असून त्याची किंमत ४ कोटी पौंड ठेवली असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Twitter Blue Tick: ‘ब्लू टिक’साठी पैसे भरावेच लागणार? ट्विटरवर एलॉन मस्क यांचे सूतोवाच, म्हणाले, ‘पुढील आठवड्यात…!’

मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत उद्योपतींपैकी एक असून फोर्बच्या यादीनुसार ते आठव्या क्रमांकावर आहेत. रिलायन्सने १२ वर्षांपूर्वीही लिव्हरपूल क्लबमध्ये भागीदारी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी रिलायन्स आणि सहारा ग्रुप मिळून लिव्हरपूल विकत घेण्याच्या तयारीत होते. मात्र, आता केवळ रिलायन्सकडून हा क्लब खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Video: तिकीट दिलं नाही, म्हणून थेट वीजेच्या ट्रान्समीटरवर चढून बसला उमेदवार! व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मागील काही वर्षांपासून रिलायन्स ग्रुपने खेळावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. रिलायन्सग्रुपकडे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचीही मालकी आहे. तसेच इंडियन फुटबॉल सुपर लीग स्थापन करण्यातही रिलायन्सची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.