भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ कोणते असा प्रश्न विचारल्यास तुम्ही ताजमहल, जम्मू-काश्मीर, हिमाचल, दक्षिण भारत यापैकीच एखादे उत्तर द्याल. मात्र ट्रीपअॅडव्हाझर या वेबसाईटने एका सर्वेक्षणाच्याआधारे तयार केलेल्या ‘टॉप १० ट्रॅव्हलर्स चॉइस एक्सपिरयन्स २०१९- वर्ल्ड अॅण्ड आशिया’ यादीमध्ये पहिल्या दहामध्ये भारतातील केवळ एक ठिकाणाचा समावेश आहे. भारतातील हे एकमेव ठिकाण म्हणजे मुंबईतील धारावी झोपडपट्टी. मुंबईमधील धारावी झोपडपट्टी ही आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. ताजमहालला भेट देण्याऐवजी या झोडपट्टीला भेट देत तेथील अनुभव घेण्यासाठी पर्यटक अधिक उत्सुक असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे.
पर्यटकांना भारतामध्ये फिरताना कोणत्या गोष्टी पहायला आणि अनुभवायला आवडतात यासंदर्भात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांऐवजी स्थानिक लहान ठिकाणांना अधिक पसंती मिळाली आहे. यामध्ये छोट्या जागांवरील अनेक छोट्या आणि आगळ्यावेगळ्या कारणासाठी लोकप्रिय असणाऱ्या टूर्सची संख्या अधिक आहे. याच यादीमध्ये धारावी दहाव्या क्रमांकावर असून ताजमहाल आशियातील टॉप १० जागांच्या यादीमध्ये कुठेच नाही. भारतातील धारावीनंतर या यादीमध्ये जुन्या दिल्लीचा क्रमांक लागतो. त्याखालोखाल ताजमहाल आणि आग्र्याच्या किल्ल्याचा क्रमांक लागतो.
एक्सप्रेस ट्रेनने दिल्ली आग्रा प्रवास करुन ताजमहल पाहणे, दिल्लीमध्ये शॉपिंग करणे, मुंबईमधील बॉलिवूड दर्शन, दिल्लीच्या जुन्या बाजारामध्ये फेरफटा मारणे, मास्तरजी की हवेलीला भेट, नवीन तसेच जुन्या दिल्लीमधील एका दिवसाची भटकंती, मुंबई दर्शन, दिल्लीमधील संजय कॉलिनी झोपडट्टीला भेट या गोष्टींचा भारतामधील सर्वाधिक पसंती असलेल्या जागांच्या यादीत समावेश आहे.
जागतिक स्तरावरील सर्वात लोकप्रिय ठिकाणे
१)
फास्टर दॅन स्कीप द लाइन, व्हेटीकन सिस्टीन चॅपल आणि सेंट पीटर्स बॉसिलीका टूर रोम, इटली
२)
शिकागो आर्किटेक्चर रिव्हर क्रुझ, शिकागो, लिलीनोइस, अमेरिका
३)
तुस्कनीची एकदिवसीय सहल, फ्लोरेन्स, इटली
४)
स्नोरकलिंग सिल्फ्रा टूर, रिक्जेविक, आइसलॅण्ड
५)
रेड रॉक कॅनियन इलेक्ट्रीक बाइक टूर, लॉस वेगस, नेवाडा, अमेरिका
६)
व्हिंटेज साईडकार टूर, पॅरिस, फ्रान्स
७)
अॅमस्टरडॅममधील अॅनी फ्रॅंक हाऊसमध्ये कॅनल टूर, अॅमस्टरडॅम, नेदर्लण्ड्स
८)
उबूडमधील जंगली झोपाळा, उबूड, इंडोनेशिया
९)
शीआनमध्ये फूड टूर, शीआन, चीन
१०)
कॅटूना रिव्हर व्हाइट वॉटर, ओकीरी फॉल्स, न्यूझिलंड
आशियामधील टॉप १० आकर्षणे
१)
उबूडमधील जंगली झोपाळा, उबूड, इंडोनेशिया
२)
शीआनमध्ये फूड टूर, शीआन, चीन
३)
बिजिंग हूटॉग फूड आणि बियर टूर, बिजिंग, चीन
४)
थाय आणि आखा कुकिंग क्लास, चीआंग माय, थायलंड
५)
हानोई स्ट्रीट फूड टूअर, हानोई, व्हिएतनाम
६)
टोकियो बायकिंग टूर, रोपाँगी, जपान
७)
कु ची टनलमधून स्पीडबोटने फेरी, हो ची मिंच शहर, व्हिएतनाम
८)
अँगकोर वॅट टूर, सिम रिअॅप, कंबोडिया
९)
क्रॅबी सनसेट क्रूझ, अॅओ नाग, थायलंड
१०)
धारावी टूर, मुंबई, भारत