विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ आजारी असलेल्या आईला बघण्यासाठी मंगळवारी दुबईला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील वृत्तपत्रांमध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
तब्येत खालावल्यामुळे मुशर्रफ यांच्या ९५ वर्षांच्या आईला दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला बघण्यासाठी मुशर्रफ दुबईला जाण्याची शक्यता असल्याचे ‘द न्यूज डेली’ने म्हटले आहे. दुबईला जाण्यासाठी तात्पुरता जामीन द्यावा, अशी मागणी मुशर्रफ न्यायालयाकडे करणार आहेत. न्यायालयाने तो मंजूर केल्यानंतरच ते दुबईला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणारे नवाज शरीफ येत्या बुधवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याच्या एक दिवस अगोदरच मुशर्रफ दुबईला जाणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात विविध तर्क लढविले जाताहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2013 रोजी प्रकाशित
आईला भेटण्यासाठी परवेझ मुशर्रफ दुबईला जाण्याची शक्यता
विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली सध्या अटकेत असलेले पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ आजारी असलेल्या आईला बघण्यासाठी मंगळवारी दुबईला जाण्याची शक्यता आहे.
First published on: 03-06-2013 at 12:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musharraf may leave pakistan to visit ailing mother in dubai