नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन केले त्यावेळी त्यांनी काश्मीरच्या युवकांना काय हवे आहे असा प्रश्न केला. काश्मीरच्या युवकांना पर्यटन हवे की दहशतवाद असा सवाल त्यांनी येथे उपस्थित केला. काश्मीरमध्ये काही तरुण दगडफेक करत आहेत तर काही तरुण दगडांना फोडून बोगदे निर्माण करण्याचे काम करत आहे. तुम्हाला नवनिर्माण करायचा आहे की अशांतता निर्माण करायची आहे याचा निर्णय तुम्हीच घ्यावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
https://twitter.com/ANI_news/status/848510825405054976
गेल्या चाळीस वर्षांमध्ये काश्मीरमध्ये केवळ हिंसाचारच झाला. जर हिंसाचाराऐवजी या ठिकाणी पर्यटनाच्या विकासाबद्दल बोलले गेले असते तर सर्व जग आज काश्मीरच्या पायाशी लोळताना दिसले असते असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. हिंसेने कुणाचेही भले होणार नाही असे ते म्हणाले. हिंसेने सर्वाधिक नुकसान जम्मू आणि काश्मीरमधील लोकांचेच झाले असल्याचे ते म्हणाले.
https://twitter.com/ANI_news/status/848510927024664576
जम्मू काश्मीरमधील नशरी ते चेनानी असा हा बोगदा तयार करण्यात आला असून या बोगद्यामुळे जम्मू ते श्रीनगर हे अंतर तब्बल ३० किलोमीटरने कमी झाले आहे. द्रुतगती मार्गावरील या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर हे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे. चार वर्षांच्या विक्रमी वेळेत देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
https://twitter.com/ANI_news/status/848511760621600768
गेल्या काही वर्षांपासून जम्मू काश्मीरमधील रस्ते आणि लोहमार्गाचा विकास करण्यावर केंद्र सरकारकडून भर देण्यात आला आहे. जम्मू ते श्रीनगरला जोडण्यासाठी नशरी ते चेनानी असा बोगदा तयार करण्यात आला आहे. ९.२८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरला आहे. पाच वर्षांची अथक मेहनत आणि तब्बल ३,७०० कोटी रुपये खर्च करुन या बोगद्याचे काम मार्गी लागले. या बोगद्यामुळे दररोज २७ लाख रुपयांच्या इंधनाची बचत होईल.