पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सिक्कीम दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी राज्यातील एकमेव विमानतळाचं उद्धाटन केलं आहे. विशेष म्हणजे रविवारी एसआय-8 हेलिकॉप्टरने नरेंद्र मोदी सिक्कीमला पोहोचले. यावेळी नरेंद्र मोदींनी प्रवासात सिक्कीमचं सौदर्य कॅमेऱ्यात कैद केलं. सिक्कीमचं सौंदर्य पाहून नरेंद्र मोदींना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. हे फोटो त्यांनी ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोटो ट्विटरला शेअर करताना नरेंद्र मोदींनी लिहिलं आहे की, ‘सिक्कीमला जात असताना हे फोटो काढले आहेत. मोहक आणि अविश्वसनीय’.

हिमालयाच्या पर्वतरांगातील सिक्कीम राज्याला आज पहिलं विमानतळ मिळालं आहे. राज्यातील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. आतापर्यंत सिक्कीमला जायचे असल्यास गंगटोकपासून १२४ किलोमीटर अंतरावर असलेल्या प. बंगालमधील बागडोग्रा येथील विमानतळावर जावे लागत होते. परंतु, पाकयाँग विमानतळामुळे आता सिक्कीमही देशाच्या हवाई नकाशावर आले आहे. देशात सर्वाधिक उंचीवर असलेल्या पाच विमानतळांपैकी हे एक आहे. हे विमानतळ देशातील 100 वं कार्यरत असलेलं विमानतळ ठरेल. पर्यटनासाठी आणि सिक्कीमच्या आर्थिक विकासासाठी या विमानतळाचा फायदा होणार आहे. समुद्रसपाटीपासून 4,500 फूट उंचीवर असलेलं हे विमानतळ 201 एकर क्षेत्रावर विस्तारलं आहे. सिक्कीममधील पाकयाँग विमानतळासाठी 605.69 कोटी रुपये खर्च आला आहे. हे विमानतळ अभियांत्रिकी कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे.

सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर पाकयाँग विमानतळ आहे. पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळीच या विमानाच्या उद्घाटनासाठी गंगटोकमध्ये पोहोचले होते. सिक्कीमला पोहोचल्यानंतर मोदींनी तेथील फोटोही ट्विटरद्वारे शेअर केले. स्पाइसजेट कंपनीने या विमानतळावरून कोलकाता येथून दररोज उड्डाणांचे नियोजन केले असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi captures sikkim in camera
First published on: 24-09-2018 at 12:13 IST