सत्तेत आल्यास शंभर दिवसांत काळा पैसा मायदेशी आणण्याचे अश्वासन भाजपने दिले होते, मात्र सरकारला त्यात अपयश आल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील सभेत केली.
काँग्रेसवर टीका करणारे भाजप आता काळा पैशाच्या मुद्दय़ावर प्रशासकीय कारणे सांगत आहे. या मुद्दय़ावर संयम, गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. मात्र भाजपकडे या दोन्हीही गोष्टी नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची राहुल यांनी खिल्ली उडवली. लोकांच्या हाती केवळ झाडू देण्यापेक्षा जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. झारखंडमध्ये काँग्रेस थेट कधीच सत्तेत नव्हती. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून आमच्यावर टीका करू नये, असा सल्लाही त् दिला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2014 रोजी प्रकाशित
काळ्या पैशाबाबत केंद्राला अपयश
सत्तेत आल्यास शंभर दिवसांत काळा पैसा मायदेशी आणण्याचे अश्वासन भाजपने दिले होते, मात्र सरकारला त्यात अपयश आल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील सभेत केली.
First published on: 23-11-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi fall short to bring back black money rahul gandhi