पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे आज (रविवार) हरियाणा येथील रेवाडीमध्ये माजी सैनिकांच्या रॅलीला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान पदाचे उमेदवार बनल्यानंतर मोदींची ही पहिलीच रॅली असणार आहे. त्यामुले मोदींचे भाषण लाईव्ह ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाषण सुरू झाल्यानंतर आपल्या मोबाईलवरून ०२२४५०१४५०१ वर डायल करून भाषण ऐकू शकता. या रॅलीत मोदी राष्ट्रीय सुरक्षा आणि माजी सैनिकांना निवृत्तीनंतर नोकरी मिळवण्यासाठी होणा-या अडचणींसहित इतर मुद्यांवर बोलतील.
मोदींच्या या सभेला दीड लाखांपेक्षा अधिक लोक सहभागी होण्याा दावा भाजपाने केला आहे. रेवाडीच्या सचिवालय मैदानात होणा-या या रॅलीमध्ये बहुतांश माजी सैनिक असतील. या रॅलीत मंचावर निवृत्त मेजर जनरल व्ही. के. सिंहही उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2013 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदींचे भाषण लाईव्ह ऐकण्यासाठी डायल करा हा नंबर
पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे आज (रविवार) हरियाणा येथील रेवाडीमध्ये माजी सैनिकांच्या रॅलीला संबोधित करणार आहेत.

First published on: 15-09-2013 at 12:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi rally after being pm candidate of bjp nda