लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर नरेंद्र मोदी आपला मतदारसंघ वाराणसीत पोहोचले आहेत. शपथविधी होण्याआधीच नरेंद्र मोदी मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी बाबा विश्वनाथ मंदिराचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी पुजा-अर्चना केली. याशिवाय नरेंद्र मोदी कालभैरवाचं दर्शन घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी संपुर्ण शहरभर सजावट करण्यात आली असून, फुलांचा वर्षाव करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच वाराणसी भेटीसाठी पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी रस्त्यामार्गे काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचतले. पोलीस लाईन ते विश्वनाथ मंदिरामधील सात किमीचं अंतर ते बंद गाडीतून पार करण्यात आलं. मंदिरात पूजा केल्यानंतर नरेंद्र मोदी समर्थकांना संबोधित करणार आहेत.

नरेंद्र मोदी याआधी २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी काशीत आले होते. तेव्हा रोड शो नंतर त्यांनी गंगा आरती केली होती. निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर नरेंद्र मोदींनी बाबा विश्वनाथ मंदिरात अभिषेक केला. जवळपास अर्धा तास मंदिरात पुजा सुरु होती. नरेंद्र मोदी काशी विश्वनाथ मंदिरात येण्याची ही नववी वेळ आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनातून रविवारी संध्याकाळी या याबाबतची माहिती देण्यात आली. राष्ट्रपती भवनात गुरुवारी, ३० मे रोजी संध्याकाळी ७ वाजता शपथविधी समारंभ होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधानांना आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती कोविंद यांनीही ट्वीट करून शपथविधीबद्दल माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi varanasi rally lok sabha election result
First published on: 27-05-2019 at 10:24 IST