भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी रविवारी सुपरस्टार रजनीकांतची भेट घेणार आहेत. ही भेट रजनीकांत यांच्या निवासस्थानी होणार असून या दोघांमध्ये निवडणूकी बाबत तसेच राष्ट्रीय आणि प्रादेशीक मुद्यांवर चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तमिळनाडू मध्ये तिसऱया क्रमांकावर असलेल्या एनडीएची ताकद वाढवीण्यासाठी ही भेट महत्वाची ठरेल. कारण, भारतातचं नाहीतर जगात रजनीकांतचे असंख्य चाहते आहेत. दक्षिणेत्तर त्यांची देवाच्याजागी ठेवून पूजा केली जाते. याभेटीमुळे भाजपला फायदाच होईल. यानंतर मोदी एनडीएच्यामित्र पक्षासोबत चेन्नई मध्ये रोड शो करतील व प्रचार सभेला संबोधीत करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Apr 2014 रोजी प्रकाशित
मोदी जाणार रजनीकांतच्या भेटीला
भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी रविवारी सुपरस्टार रजनीकांतची भेट घेणार आहेत.

First published on: 13-04-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi will meet rajnikant