पंजाबचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू जे सध्या पतियाळा तुरुंगात असुन, त्यांनी आता नवरात्रीच्या काळात मौन व्रत सुरू केले आहे. दसऱ्याच्या दिवशी ते हे मौन व्रत सोडणार आहेत. ३६ वर्ष जुन्या मारहाण प्रकरणात सध्या सिद्धू पतियाळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

नवज्योतसिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मौन व्रताबाबत ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. “नवरात्र उत्सवात माझे पती मौन बाळगणार आहेत. ५ ऑक्टोबर नंतर येणाऱ्यांना भेटतील.”

३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात आहेत. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पतियाळा कोर्टात आत्मसमर्पण केल्यापासून तो पतियाळा जेलमध्ये आहे.

याशिवाय, नवज्योत सिंग सिद्धू यांनी पक्षातील सहकारी आणि माजी मंत्री भारत भुषण आशू यांच्याविरोधात दाखल छळवणूक प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर राहण्यास नकार देत न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका लुधियाना न्यायालयाने फेटाळली आहे. ३४ वर्ष जुन्या मारहाण प्रकरणात सध्या सिद्धू पतियाळा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. भारत भुषण आशूदेखील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात याच तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. आशूंविरोधातील हे प्रकरण नेमके काय आहे? या प्रकरणात सिद्धू न्यायालयात हजर होण्यास टाळाटाळ का करत आहेत? याबाबतचे हे विश्लेषण.